
वाळूज महानगर – पंढरपूर येथे विठ्ठल रुखमाई मंदिर ते तिरंगा चौक दरम्यान बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 24) रोजी करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड, जिल्हा परिषद सदस्या विद्या गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य मनोज गायके, पंचायत समिती सदस्या लताबाई कानडे, नगरसेवक कैलास गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू जाधव, उपतालुका प्रमुख सुभाष साबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य आमेर पठाण, विठ्ठल रुखमाई मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, लक्ष्मण शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंढरपूर येथील जि.प.सदस्य विद्या रमेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नाने व उपनिधीतून विठ्ठल -रुख्मिणी मंदिर ते तिरंगा चौक दरम्यान 16 पथदिवे जवळपास 15 लाखाचा निधी खर्च करण्यात येऊन बसविण्यात आले आहे.
यामुळे महामार्गावर भाविकांसह वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे. या कार्यक्रमाला दौलतखा पठाण, बाबासाहेब झळके, दीपक कानडे, साहेबराव दाभाडे, अविनाश घुले, विनायक झळके,
कुणाल खराटे, रुबिना बाजी आदींसह भाविकांची उपस्थिती होती. भीमराव पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
