
वाळुज महानगर, (ता.17) – महाशिवरात्रीनिमित्त शिवशक्ती अगस्त ऋषी आश्रम, रामपुरी तांडा छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी 15 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 101 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात डॉ. गंगाधर देवबोणे (असेगावकर) व श्री हिरालाल राठोड (महाराज अगस्ती मंदिर आश्रम) यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यात रुग्णांची तपासणी ही डॉ. प्रियंका बंडगर, डॉ. अक्षय बंडगर व डॉ. किशोर देवोबोने यांनी केली. ही आरोग्यसेवा महालक्ष्मी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व श्री महालक्ष्मी मेडिकल कोलगेट चौक बजाजनगर छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आली होती. या शिबिरात 101 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला. व शिबिरास रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल डॉक्टरांनी आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मनोहर बंडगर, अशोक राठोड, मनोज बंडगर (श्री महालक्ष्मी मेडिकल) व ओम व्हरे, सुजाता भालेराव आणि राणी कीर्तीशाही यांनी विशेष सहकार्य केले.

I love the unique feel of the slots here. It is refreshing to find a site that doesn’t feel like a copy of everything else. Definitely check out pedetectiveslots.