February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.13)- दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली चिरडून 54 वर्षीय महिला जागीच ठार झाली. मात्र सुदैवाने या अपघातातून दुचाकीवरील बाप व लेक बालंबाल बचावले. हा अपघात सोमवारी 12 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पंढरपुर येथील तिरंगा चौकात झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, रांजणागाव (शेपु) येथील दिलीप विश्वनाथ ढाकरके, आशाबाई दिलीप ढाकरके व नेहा दिलीप ढाकरके हे कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थाच्या रुग्णालायत उपचार घेऊन दुचाकी (एमएच 20, सीडी – 7460) वरून पंढरपूर मार्गे रांजणगावकडे येत होते. पंढपुर येथील तिरंगा चोकात त्यांच्या दुचाकीला कंटेनर (एमएच 46, बी यु – 2398) ने धडक दिली. त्यामुळे आशाबाई ढाकरके या दुचाकीवरून खाली पडल्या. त्याचवेळी आशाबाई यांच्या अंगावरून कंटेनर गेला.

या कंटेनर चे चाक डोक्यावरून गेल्याने आशाबाई ढाकरके या चाकाखाली चिरडून ठार झाल्या. मात्र सुदैवाने दिलीप ढाकरके व त्यांची मुलगी नेहा हे दोघे बापलेक बालंबाल बचावले. सोमवारी 12 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर महामर्गावर वाहतूक कोंडी होऊन मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. ही माहिती मिळताच वाळूज वाहतुक शाखेचे निरिक्षक राजेश यादव यांनी घटनास्थळी धाव घेत खाजगी रूग्णवाहिकेतून तिघांना पुढील उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले. दरम्यान अपघात स्थळावरून अज्ञात ट्रक चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *