February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.12) – बजाजनगर येथील राजे शिवाजी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी. साळुंखे हे होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक इ.डी.पठाण, राजन सोमासे, एस. आर. जाधव, वाल्मिक गायकवाड, रविंद्र निकम, प्रविण राजे,सोनल वैष्णव, ज्योती बोडके, सुकेशनी शेगावकर, योगिता बनकर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच मुख्याध्यापक साळुंके सरांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विवेकानंदांना समजून घ्यायचे असेल तर त्यांची पुस्तके वाचा व ज्ञान मिळवा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा ठमके यांनी केले तर आभार विनोद शिंदे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *