
वाळुज महानगर, (ता.26) – बजाजनगर येथील एका बियरबार समोर उभी केलेली वीस हजार रुपये किमतीची दुचाकी मंगळवारी 23 डिसेंबर रोजी रात्री लंपास केल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी 25 डिसेंबर रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
बजाजनगर येथे राहणाऱ्या आकाश चौथमल याने त्याची मंगळवारी 23 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्याची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 38, एस – 1922) ही हॅन्ड लॉक करून उभी केली होती. रात्री 11:30 वाजेच्या सुमारास हॉटेल मधून बाहेर आला असता उभ्या केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. त्या दुचाकीचा आज पावतो शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
