
वाळूज महानगर, (ता.26) – भरधाव जाणारी दुचाकी घसरल्याने 35 वर्षीय दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करमाड येथील आमंत्रण हॉटेल समोर झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी, रवी त्रिंबक भालेराव (वय 35 वर्ष) रा. तळेगाव कुंबेफळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा दुचाकी (एम एच 21, बी यु – 0458) वरून भरधाव जात असताना त्याची दुचाकी घसरून तो गंभीर जखमी झाला. करमाड येथील आमंत्रण हॉटेल समोर शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच करमाड येथे उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य स्वामी यांची चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी अंबुलन्सचा चालक बाळू कातखडे यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारार्थ दाखल केले.

Took a gander at 8okvip.info. It’s fairly pleasant. Check it out! Let me know what you think about 8okvip. Its something special.