
वाळुज महानगर, (ता.26) – सिडको वाळूज महानगर-1 मधील सारा वृंदावन सोसायटीतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेकडो रहिवाशांनी बुधवारी 24 डिसेंबर रोजी हंडा मोर्चा काढून सिडको विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
वाळूज परिसरातील सिडको वाळूज महानगर-1 येथील सारा वृंदावन गृहनिर्माण सोसायटीमध्ये एकूण 147 रो हाऊसेस आणि अंदाजे 600 रहिवासी आहेत. या परिसरात आठवड्यातून एक वेळ पाणी येते. अर्धा ते पाऊण तास चालणारे या पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी हंडा मोर्चा काढून गुरुवारी 24 डिसेंबर रोजी सिडको प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. यावेळी सुनीता अहिरे, सविता हिरे, मीना मुंडे, स्वाती जाधव, साधना शेळके, सुनंदा देवगावकर, आशा कडू, चित्रा गायकवाड, संजीवनी कापसे, मनीषा पाटील, मनीषा माने, कस्तुरा जाधव, विद्या रत्ना पाटील, सुवर्ण पाटील, सुशोभन पाटील, डोंगरे, सुनीता मूगावकर, मनीषा पाटील, पूजा श्रीवास्तव, अशोक परमाणे, भरत कबाडे, संजय अहिरे उपस्थित होते.
