
वाळुज महानगर, (ता.25) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील के पी सेल्स कार्पोरेशन कंपनीकडून पाईप व फिंटीगचे साहीत्य खरेदी करून पुण्याच्या मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. संचालकांनी संगणमत करुन फसविण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक व्यवहार असक्रीय असलेल्या बँकेचे चेक देऊन तसेच विश्वासघात करुन पैसे आज देतो, उद्या देतो. अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन 91 लाख 82 हजार 789 रुपयाची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पुण्याच्या उद्योजक पती-पत्नीवर गुरुवारी 24 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयराज बाबुराव पाटील (वय 53 वर्ष) यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत के.पी. सेल्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे. ही कंपनी टाटा व जिंदाल या कंपनीचे पाईप औद्योगीक क्षेत्रात सप्लाय व विक्री करते. 29 एप्रील 2025 मध्ये पुणे येथील मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.चे मालक /संचालक राहुल महीमकर व व त्यांची पत्नी प्रिती माहीमकर यांना जिंदाल या कंपनीच्या पाईपची आवश्यक्ता होती.

त्यामुळे दोघे पती-पत्नी हे जयराज पाटील यांच्या कंपनीत आले. त्यामुळे त्यांच्या आर्डर प्रमाणे त्यांच्या कंपनीला डीएमआयसी बीडकिन, पांडेचेरी, धारवाड, कागल कोल्हापुर, चाकन पुणे, खोपोली या साईडवर पाईप असे एकुण 2 कोटी 26 लाख 82 हजार 190 रुपयाचे पाईप व फिंटीगचे साहीत्य सप्लाय केले. त्यावर त्यांनी जयराज पाटील यांना 1 कोटी 34 लाख 99 हजार 401 रुपये के.पी. सेल्स कॉर्पोरेशनच्या खात्यावर ट्रांन्सफर केले. बाकी रक्कम 91 लाख 82 हजार 789 रुपये दिले नाही. त्यामुळे जयराज पाटील यांनी राहुल माहीमकर व त्याचे पार्टनर प्रिती माहीमकर यांना कॉल केले. परंतु त्यांनी फोन उचलले नाही. संपर्क झाल्यानंतर त्यांनी कळविले की, मला संबंधिताकडुन पैसे मिळाले नाही. त्यांच्याकडुन पैसे आले तर मी तुम्हाला देतो. त्यामुळे ज्या साईडवर माल सप्लाय केला, त्यांच्याकडे जयराज पाटील यांनी खात्री केली असता समजले की, मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.चे सचांलक राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांना त्यांचे पैसे मिळाले. परंतु त्यांनी जयराज पाटील यांचे पैसे देले नाही. याप्रकरणी जयराज पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. संचालक राहुल माहीमकर व प्रिती माहीमकर यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिमकर पती-पत्नीने चेक देऊन केली फसगत –
जयराज पाटील यांनी व्यवहाराची रक्कम देण्याबाबत माहीमकरकडे विचारणा केली असता, त्यांनी ऍक्सीस बँकेचे 6 चेक सेक्युरीटी म्हणुन दिले. मात्र ऍक्सीस बँकेत व्यवहार असक्रीय असल्याने तुम्ही असक्रीय व्यवहाराचे बँकचे चेक का दिले? असे विचारल्यावर माहीमकर यांनी कोटक महींद्रा बँकेचे 6 चेक दिले. ते बँकेत वटविण्यासाठी टाकले असता रक्कम पुरेशी नसल्याने चेक अनादरीत झाले. त्यानंतर पुन्हा राहुल माहीमकर यांनी आयसीआयसीआय बँकेचे 6 चेक दिले. ते वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, राहुल माहीमकरच्या खात्यावर रक्कम पुरेशी असतांनासुध्दा माहीमकर याने बँकेत कळविले की, पेमंट थाबवुन चेक परत करण्यास सांगीतले.
