
वाळुज महानगर (ता.22) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील खुलेआम सुरू असलेली अवैध दारुविक्री, सोरट, बुकी, उघड्यावरील मांसविक्री, बेशिस्त वाहतूक, न मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यासह छेडछाड, लुटमार, चोरीच्या घटना, त्याचप्रमाणे वाढती गुन्हेगारी या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या पोलिस प्रशासन,
https://youtube.com/watch?v=asZn6mgGVkk&si=JgiDOtMhv3nhxUzz RK NEWS LIVE का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App
https://primetrace.com/group/821231/post/1174789138?utm_source=android_post_share_web&referral_code=H2MZ8&utm_screen=post_share&utm_referrer_state=SUPER_ADMIN
आरोग्य व उत्पादन शुल्क विभागावर रोष व्यक्त करत पुकारलेल्या बेमुदत रांजणगाव बंद मध्ये नागरिकांनी सोमवारी 22 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाडून संबंधित विभागावर कडक ताशेरे ओढले. दरम्यान नागरिकांचा रोष पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून कायमचा आळा घालण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला.
या बेमुदत गावबंदमध्ये सकाळपासूनच सर्वच दुकानदार, व्यवसायिक, व्यापार्यांनी आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवली. या गावबंदला सर्वच पक्ष, सामाजिक संघटनेने पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला. प्रारंभी येथील शिवस्मारकापासून आरोग्य पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या निषेधार्थ विविध घोषणा देत मोर्चा काढला. 
या मोर्चाचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर सभेत रूपांतर झाले. या सभेत माजी पंचायत समिती सदस्य दिपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, श्री गजानन विद्यामंदिरचे संस्थापक आय जी जाधव, उपसरपंच भिमराव किर्तीशाही, मोहिनी बढे, संगीता पंडित, शालिनी वाकोडे, रमा उबाळे, भारत गरड, सुभाष सोनवणे, कृष्णा लोहोकरे आदी महिला व नागरिकांनी सर्व अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात रोष व्यक्त करत अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरत त्यांना जाब विचारुन आठ दिवसांत सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. सभेचे सुत्रसंचालन दत्तू हिवाळे तर आभार माजी सरपंच दिपक सदावर्ते यांनी मानले. याप्रसंगी मुरमी येथील वैष्णवी संतोष निळ या महाविद्यालयीन युवतीच्या हत्त्येच्या घटनेचा निषेध करत तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. 
यावेळी सरपंच कविता बाबुराव हिवाळे, माजी सरपंच योगिता प्रभाकर महालकर, मोहनीराज धनवटे, बाबूराव हिवाळे, शरद किर्तीकर, साईनाथ जाधव, पंकज हिवाळे, शेख जावेद, सय्यद अलिम, मनोहर गवई, नितीन शेजूळ, काकासाहेब कोळसे, भिमराव मोरे, विजय शिनगारे, शेख अजिजा, मिना पनाड, नंदा राजपूत, शेख शबाना, पुष्पा गायकवाड, सुनिता राठोड, मिरा हिवाळे आदींसह महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला. 
आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊ –
यावेळी आरोग्य सेवा सुविधांबाबत गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी तुपे यांनी उघड्यावर होणारी मांस विक्री माझ्या अत्यारीत येते की, नाही. याविषयी कल्पना नाही. ती जर माझ्या अत्यारीत येत असेल तर वरिष्ठांच्या आदेशानुसार उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

अवैध धंद्यावर अनेक वेळा कारवाई –
यावेळी वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी अवैध धंदे चालकावर नियमित कारवाई करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना अवैध धंदे संदर्भात माहिती असल्यास थेट टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अवैध दुकानाच्या आड्ड्याबाबत गाडे म्हणाले की, ग्रामपंचायतने अशा दारू आड्ड्याचे अतिक्रमण हटवावे. त्यासाठी जेव्हा बंदोबस्त पाहिजे तेव्हा देईल. असे आश्वासन दिले.
अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई सुरूच –
यावेळी दारुबंदी विभाग निरिक्षक अजय बगाटे यांनी केलेल्या कारवाई बाबत सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने परिसरात अनेक वेळा कारवाई केली, आणि ती यापुढेही सुरूच राहील. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. असे त्यांनी सांगितले.

बंद कडकडीत मात्र शांततेत –
या गावबंद आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिल्याने संपूर्ण गाव कडकडीत बंद होते. दरम्यान कुठलाही गोंधळ उडून शांतता भंग होऊ नये. यासाठी एमआयडीसी वाळूज ठाणे, वाहतूक शाखा व शहरातील विशेष शाखेच्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
