February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.20) – वडगाव कोल्हाटी व साजापूर येथील दाट लोकवस्ती असलेल्या विविध गट नंबर या नागरी भागातून जाणार्या धुळे-सोलापूर ते वडगाव-सिडको हा नियोजित लिंक रोड रद्द करा. अशी मागणी करणारे निवेदन महिलांनी छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरण नगररचना विभागाचे महानगर नियोजनकार यांना शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी दिले.

या नियोजित 24 मीटर च्या लिंक रोड मुळे नागरिकांचे राहते घर व इतर बांधकामे बाधित होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा लिंक रोड रद्द करण्यात यावा किंवा तो इतरत्र वळविण्यात यावा असेही या निवेदनात नमूद आहे. यावेळी आश्विनी भालेकर, ज्योती कांबळे, ज्योती कल्याणकर, रोहिणी मुळे, प्रमीला म्हस्के, कोमल देशमुख, आश्विनी बासोडे, अर्चना नरोडे, मनीषा सोनवने, नंदीनी तेलंगे, सुषमा स्त्रीपत, चित्रकला दांडगे, ललीता अधाने, कवीता अधाने, निर्मला गांवडे, मनीषा मालकर, मीरा राठोड, मंगल पाटेकर, सुमन राठोड, रोशनी गीरासे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *