February 5, 2026


वाळुज महानगर,(ता.19)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटात ज्ञान भवन इंग्लिश स्कूल बजाजनगरचा राजवीर कैलास जाधव याची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तो मराठवाडा विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी उद्योजक हनुमान भोंडवे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, वैभव पवार, ज्ञानभवन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा बडे, क्रीडा अधिकारी रामकिसन मायंदे, डॉ. रेखा परदेशी, सुजाता गुल्हाने, पुनम नवगिरे, गीता साखरे, सचिन पुरी, गणेश पाळवदे, सदानंद सावळे, गंगापूर तालुका क्रीडा संयोजक शेख शफीक बीएसएफचे कोषाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, समाधान हराळ, दत्ता पवार, ओमप्रकाश वाघमारे, रामेश्वर वैद्य, आशिष सुवर्णकार यांनी या खेळाडूचे स्वागत करून पुढील राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजवीर जाधव या ला राष्ट्रीय पंच अशोक जंगमे, भीमराज रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *