February 5, 2026

वाळुज महानगर – अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी महा-ई-सेवा केंद्रावर सुरू असलेल्या केवायसी शिबिराला तहसीलदार नवनाथ वाघवाड यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला.
केवायसी असल्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. म्हणून सध्या महा-ई-सेवा केंद्रावर केवायसी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वाळुजच्या महा ई सेवा केंद्रात सुरू असलेल्या अतिवृष्टी अनुदान यादी केवायसी शिबिराला गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी शनिवारी 13 डिसेंबर रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरित केवायसी करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी मनिषा कदम, वाळूज सरपंच सईदाबी पठाण, ग्रामपंचायत सदस्य नदीम झुंबरवाला, महसूल सेवक अमोल खैरनार, महा ई सेवा केंद्र संचालक अरुण कानडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच सईदाबी पठाण यांनी वाळूज ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार वाघवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *