
वाळूज महानगर – वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 9 मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने महिलांनी सुरू केलेल्या उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी उपोषणार्थी महिलांशी सविस्तर चर्चा करून प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 9 मध्ये रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सोयी सुविधेसाठी ज्योती कांबळे यांच्यासह शेकडो महिलांनी गुरुवारी 11 डिसेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल भैया चोरडिया, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, शहरप्रमुख विशाल खंडागळे आदींनी उपोषणस्थळी धाव घेत उपोषणार्थी ज्योती कांबळे, सीमा पायघन, प्रमिला म्हस्के, अश्विनी भालेकर, रत्ना पवार, वैशाली राजपूत, अश्विनी बासोडे, शीतल साठे, कविता आदाने, प्रीतीताई चव्हाण, करिष्मा शेख, रूपाली गायकवाड, कोमल देशमुख आदी महिलांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अनिल भैया चोरडिया यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी मीना रवताळे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव भालेराव यांच्याशी संपर्क साधून गट नंबर येथील समस्या त्वरित सोडवा नसता, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी सुदाम भांडे, नामदेव सागडे, दत्तात्रय वर्पे, प्रकाश काची, अमित चोरडिया, नरसिंग ढगे, सतीश हिवाळे, संतोष चंदन, रोहिदास चव्हाण, अमोल वाघमारे, पंढरीनाथ चोपडे, जगन्नाथ भापकर, रवीकुमार मस्के, दीपक धूरेकर, सुनील गोरे, चेतन बोरसे, पंढरीनाथ चोपडे उपस्थित होते.
——————–
