
वाळूज महानगर – औद्योगिक वसाहतीतील स्टरलाइट कंपनीच्या पाठीमागिल रांजणगाव येथील शिवस्मारक ते महादेव मंदिर दरम्यान रस्त्याचे सिमेंट काँक्रिटकरण्याच्या मागणीसाठी सोमवारी 8 डिसेंबर पासून सुरु करण्यात आलेले आमरण उपोषण तहसिलदाराच्या लेखी आश्वसनानतंर गुरुवारी 11 डिसेंबर रोजी सोडण्यात आले.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील छत्रपती शिवस्मारक ते ओमसाईनगरातील महादेव मंदिर दरम्यानच्या मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. स्टरलाईट कंपनी मागील हा रस्ता वाळूज औद्योगिक वसाहतीला जोडतो. रांजणगाव शेणपुंजी व कमळापूर या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा रस्ता येतो. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अरुंद असलेल्या या रस्त्याचे रुंदीकरण करुन काँक्रिटीकरण करण्यात यावे. अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरीक करत आहे. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुन नागरीकांनी उपोषणही केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून रस्त्याचे काम सुरु करु. असे आश्वासन दिले होते. मात्र रस्त्याचे काम सुरु झालेच नाही. त्यामुळे डॉ. शाम शेळके, शिवाजी गायकवाड, प्रविण साबळे, ज्ञानेश्वर जमदाडे, राजेंद्र कडु, गणेश सोनवणे यांनी सोमवार 8 डिसेंबर पासून ओमसाईनगर येथील बाळासाहेब ठाकरे चौकात उपोषण सुरु केले होते. दरम्यान एमआयडीसीचे उपअभियंता गणेश मुळीकर, तहसिलदार नवनाथ वगवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त भागिरथी पवार, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम, मंडळ अधिकारी सचीन भिंगारे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, ग्राममहसुल अधिकारी चंद्रभान माळी आदींनी उपोषणकर्त्यांची भेट भेट घेत एमआयडीसीकडून या रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी पत्र तहसीलदार नवनाथ वागवाड यांनी दिले. त्यानतंर उपस्थित त्यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन गुरुवारी 11 डिसेंबर रोजी उपोषण मागे घेण्यात आले.

सात कोटी सात लाखाचा निधी मंजूर –
उपोषण सुरू झाल्यानंतर रांजणगाव (शेपुं) ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करून येथील छत्रपती शिव स्मारक ते महादेव मंदिर ओमसाईनगर या 717 मीटर रस्त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 7 कोटी 7 लाख 19 हजार 500 रुपयांचा निधी मंदीपक बडे, दीपक सदावर्ते, जूर करण्यात येऊन त्याला प्रशासकीय मंजुरी उद्योगमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यासाठी बाबुराव हिवाळे, भिमराव किर्तीकर, प्रभाकर महालकर, दीपक बडे, दीपक सदावर्ते, साईनाथ जाधव, पंकज हिवाळे, गोंविद जाधव, मोहनीराज धनवटे, जावेद सय्यद आदी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खा. संदीपान भुमरे, आ. प्रशांत बंब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
