
वाळूज महानगर – कुटुंब गावी गेलेले असताना दोन जणांनी घराच्या वॉल कंपाऊंडची भिंत पाडून 50 हजार रुपयाचे नुकसान केले. तसेच घरातील रोख 42 हजार रुपये व कागदपत्रे चोरून नेले ही घटना मंगळवारी 9 डिसेंबर रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथे घडली.
याबाबत वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा, विजयमाला ही महिला गुरुप्रसाद कॉलनी, गट क्र 13, वडगाव कोल्हाटी येथे कुटुंबासह राहते. ती जागा त्यांनी परमेश्वर नाजरकरकडून विकत घेतली असुन तीचे खरेदीखत करुन देण्यात आले नाही. परंतु त्याची इसार पावती करुन दिली होती. मंगळवारी 9 डिसेंबर रोजी दांडगे कुटुंब परभणी येथे कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्या घराच्या कंपाउंडची भिंत मंगळवारी 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:45 वाजेच्या सुमारास पाडुन 50 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच घराचे लॉक तोडुन घरातील 42 हजार रुपये रोख, बँक पासबुक व घराचे खरेदीचे कागदपत्रे चोरुन नेले. याप्रकरणी विजयमाला अशोकराव दांडगे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी
परमेश्वर नाजरकर व एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
