February 5, 2026

वाळूज महानगर (ता.11) – मूलभूत सुविधा मिळण्यासाठी गेल्या 12 ते 15 वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने अखेर वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 9 मधील महिलांनी गुरुवार 11 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणाला बसलेल्या सर्व महिलाच असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निश्चय केला आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 9 मध्ये सुमारे बारा ते पंधरा वर्षापूर्वी प्लॉट खरेदी करून घरे बांधली. येथील लोकसंख्या सुमारे पाच हजाराच्या आसपास आहे मात्र आजही त्यांना पक्के रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे, ड्रेनेजलाईन आदी विविध मुलभूत सुविधापासून मिळाल्या नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक यांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला. अर्ज, निवेदने अशी लेखी व तोंडी मागणी केली. मात्र कोणीही दखल घेत नसल्यामुळे येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहे. त्यामुळे अखेर येथील नागरिकांनी गुरुवारी 11 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणात सर्व महिला सहभागी झाल्या असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणार्थी महिलांनी सांगितले आहे.

यावेळी ज्योती कांबळे, आश्विनी बासवडे, सिमा पायघोन, प्रमिला म्हस्के, अश्विनी भालेकर, वैशाली राजपुत, रत्ना पवार, सारीका काळे, शितल साठे, कविता आधाने, ललिता आधाने, चित्रकला दांडगे, प्रिती चव्हाण, स्वाती डुमने, हेमलता रंगारी, करिष्मा शेख, सुलताना सय्यद, कोमल देशमुख, रुपाली ओहोळ, वैशाली धसकट, रूपाली गायकवाड, सुचिता गायकवाड, आरती पळसकर, सारीका गिरासे, उषा गिरासे, राधिका भारती, ज्योती पोपळघट, प्रिती सवई, आरती उगले, कोमल देशमुख, चंदा बनकर, शीतल पवार, जयश्री बेंद्रे, छाया वाघ, गंगुबाई तांगडे, वंदना मुळे, मीना दौढ, अर्चना नरोडे, यशोदा हिवाळे, नागिना गायकवाड, वंदना सूर्यवंशी, रेवती वाघमारे, नंदिनी तेलंगे, सुनिता सोळसे, मंगल पाटेकर, कावेरी फुले, वनीता चव्हाण, अंजली वाघमारे, सुलभा तिकांडे, संगीता महीफळ आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *