
वाळूज महानगर – आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात सोशल मीडियावर अवमानकारक आणि काळे फासण्याची भाषा केल्याप्रकरणी अमरावती येथील चंद्रशेखर म. भोयर या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वाळूज पोलिसांना सोमवारी आठ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 
या निवेदनात असे म्हटले आहे की, शिक्षक टीईटी परीक्षेबाबत आमदार बंब यांनी दिलेल्या प्रतिक्रिया-विषयक एका व्हिडिओला चंद्रशेखर भोयर यांनी टॅग करून आमदारांविरोधात विवादित टिप्पणी केली. ही टिप्पणी लोकप्रतिनिधीचा अपमान करणारी, धमकीवजा आणि असभ्य भाषेत असल्याचा आहे. शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी संभाजीनगरात काही शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी, “जवळपास 70 टक्के शिक्षक लाडावलेले आहेत; संप करणाऱ्यांची वेतनकपात व सस्पेंशन व्हायला हवे,” असे व्यक्तव्य केले होते. याच विधानाचा संदर्भ घेत चंद्रशेखर भोयर यांनी सोशल मीडियावर आमदार बंब यांच्यावर काळे फासण्याची भाषा केली. याचा तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांना निवेदन देऊन तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या निवेदनात असेही नमूद आहे कि, “आमदार प्रशांत बंब हे तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांच्या विरोधात धमकीवजा भाषा करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा आणि त्याने सार्वजनिक माफी मागावी.” वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना दिलेल्या या निवेदनाप्रसंगी नंदकुमार गांधीले, बाबासाहेब शिंदे, जनार्दन चनघटे (चेअरमन), जनार्धन गांधीले पाटील, रामेश्वर मालुसरे, अशोक हिवाळे, रामदास आलोने, नंदू जगताप, पपिन माने, रवी मनगटे, रुपेश नाडे, अमोल शिंदे, अविनाश गायकवाड, सचिन मुंडे, अमजद पटेल, ताराचंद मोटे, शंकर पारदे पाटील,
नामदेव इले पाटील, सुशील गंगवाल, गणेश सुरडकर, लक्षमण राऊत आदींची उपस्थिती होती.
