
वाळुज महानगर (ता.7) – शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य अंबादास दानवे (दादा) आणि शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल भैय्या चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनात बजाजनगर येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात परिसरातील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते, असंख्य तरुण, महिला, कामगार वर्ग यांचा शिवसेना उबाठात भव्य प्रवेश सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास सर्व आजी, माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, संलग्नित सर्व संघटना, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे होणार पक्ष प्रवेश सोहळा –
बजाजनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीर, आम्रपाली बौद्ध विहारच्या पाठीमागे, आंबेडकर चौक ते जय भवानी चौक येथे आज रविवारी 7 डिसेंम्बररोजी सायंकाळी 5 वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
कोणाला खिंडार, कोणाला बसणार धक्का –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा हा भव्य प्रवेश सोहळा होत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने बजाजनगर हा अत्यंत महत्त्वाचा बालेकिल्ला असल्याने कोणत्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश घेणार आहे. आणि त्याचा धक्का कोणाला बसणार. या उत्सुकतेकडे बजाजनगर येथील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
