February 5, 2026


वाळूजमहानगर, वार्ताहर – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्यामंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी 18 तास अभ्यासिकेचा ‘महावाचन’ हा उपक्रम राबवून तसेच शांतता रॅली काढून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी 6 डिसेंबर रोजी मानवंदना देण्यात आली.

श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या सयुक्तविद्यमाने शाळेत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेत 18 तास अभ्यासिका ‘महावाचन’ व शांतता रॅलीचे आयोजन शनिवारी 6 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. प्रथम शाळेपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली. त्यानंतर शाळेत बाबासाहेबाच्या जीवन चरित्रावर शाळेच्या विद्यार्थ्यांसह माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव, संस्थेचे सचिव हारीष जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, विभागप्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ, रेखा बिदरकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुलाब मोहिते यांनी तर आभार परमेश्वर गीते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, कल्याण कुलकर्णी, विशाल जाधव, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, सुनील शिंदे, उल्हास वाघ, दिपक पठारे, पूजा गिरी, रोहिणी शेळके, विनय अवसरमोल, सोनी कुमारी, पूजा खोतकर, अस्मिता तायडे, ममता खोतकर, कल्पना निकाळजे, अंकिता सिंग, दिलीप ढोले, पूजा ठाकूर आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *