February 5, 2026

वाळुज महानगर – गोवंशाची अवैध कत्तल करून मांसाची वाहतूक करत असताना गोरक्षकांनी विरोध केल्याने त्यांच्यात तुफान राडा झाला. या घटनेत रिक्षाची तोडफोड करून रिक्षातील गोमांस रस्त्यावर फेकण्यात आले. दरम्यान गोवंशाची बेकायदेशीररित्या कत्तल करून मांस वाहतूक विरोधात संतप्त जमावाने रस्ता रोको केला. हा प्रकार शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी सकाळी वाळूज परिसरात घडला. परिणामी वाळूज औद्योगिक वसाहतीतील वाहतूक ठप्प झाली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विटावा फाट्याजवळ एका अँटो रिक्षामधून गोवंश मांस वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून गोरक्षक अमितकुमार अनिलकुमार सिंग, शंकर राजाराम सुर्यवंशी, सुरेश शिवसिंग कांबरा, देवा वामन राणे, शुभम भगवान पडघन, धोंडीबा विश्वंभर मोटे, रविकुमार अशोक पाटील, विवेक पप्पू मोठे, ओम दिनेश घोडके हे शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 9:15 वाजेच्या सुमारास विटावा फाटा जोगेश्वरीकडे जाणाऱ्या रोडवर थांबले होते. गोवंश मांस घेऊन येणारी रिक्षा येताच विटावा फाटा येथे त्यांच्यात चांगलाच राडा झाला.

डायल 112 वरून मिळाली माहिती –
विटावा फाटा येथे गोवंश मांस तस्कर व गोरक्षकांमध्ये राडा झाल्याची माहिती डायल 112 वरून वाळुज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यामुळे वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गित्ते, अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलीस अंमलदार निलेश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

 

आरोपी पोलिसांच्या स्वाधीन –
जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा गोरक्षकांचा जमाव जमलेला होता. तोडफोड झालेला एक ऑटो रिक्षा (एम एच 20, ई एफ -7023) रोडच्या बाजूला उभा होता. त्यामध्ये गोवंश मांस होते. तसेच रोडवर सुध्दा गोमांस दिसून आले. रिक्षा चालक हबीब हशम शेख (वय 38 वर्ष) व कमरूबी जलाल सय्यद (वय 60 वर्ष), दोघे रा. आंबेलोहळ ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर या आरोपीतांना घटनास्थळावर थांबून ठेवलेले होते.

 अशी लढवली शक्कल –
आरोपी रिक्षा चालक हबीब शेख व रिक्षामध्ये बसलेली महिला कमरूबी सय्यद यांनी संगणमताने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी गोरक्षक व पोलिसांना संशय येऊ नये म्हणून प्रवाशी बसण्यासाठी असणाऱ्या काळ्या पिवळ्या रंगाच्या ऑटो रिक्षात गोवंश जातीचे मांस भरून तसेच रिक्षामध्ये महिला बसवून गोवंश मांस घेऊन जात होते. याशिवाय जर कोणाला संशय आला व त्यांनी गोवंश मांस वाहतूकीस अडथळा केला. तर सोबत गोवंश कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी 4 सुरे सोबत ठेवले होते.

दोन लाख तेहतीस हजाराचा मुद्देमाल जप्त –
घटनास्थळाचे अवलोकन करता प्रकार हा गुन्हयाचा असल्याने पोलिसांनी तात्काळ पुशुवैद्दकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळावर बोलावून मांसाचा काही भाग तपासणीसाठी घेतला. तसेच पंचनामा करून आरोपी हबीब हशम शेख याच्या ताब्यातून 33 हजार रुपये किंमतीचे 110 किलो गोवंश जातीचे मांस, मांस कापण्याचे 4 लोखंडी सुरे व दोन लाख रुपये किमतीची ऑटोरिक्षा असा एकूण 2 लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल –
या प्रकरणी पोलीस अंमलदार योगेश उत्तम गुमलाडू यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम 325 भारतीय न्याय संहिता, सह कलम 5(ब), 5(सी) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1976, सह कलम 66/192 मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *