February 5, 2026

 

वाळूजमहानगर – पादचाऱ्याला दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमे होऊन ठार झाला. हा अपघात गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे झाला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मण भागचंद हिवाळे हे गुरूवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील जामा मस्जिद जवळून घरी जात होते. त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकी (एमएच 14, जीबी -1444) च्या चालकाने पाठीमागुन जोराची धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापात झाल्याने शुभम किर्तीकर व सामाजिक कार्यकत्ये मनोज जैन यांनी प्रथम खाजगी रुग्णालयात व नंतर घाटीत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. या प्रकरणी शुभम एकनाथ कीर्तीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दुचाकीस्वाराविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *