February 5, 2026


वाळुज महानगर (ता.4) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवरील ईसारवाडी फाट्यावर बुधवारी तीन डिसेंबर रोजी सायंकाळी झाला.

 

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की,
अंबड जिल्हा जालना येथील विठ्ठल आप्पा चव्हाण (वय 32) हे दुचाकीवरून बुधवारी 3 डिसेंबर रोजी गंगापूर येथे जात होते. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील ईसारवाडी फाट्याजवळ विठ्ठल चव्हाण यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात ते गंभीर जखमीं झाले. या अपघाताची माहिती मिळताच ईसारवाडी पॉईंटवर असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधाम यांच्या 24 तास सेवेत असणाऱ्या विनामूल्य ॲम्बुलन्स चे पायलट संदीप त्रिंबके यांनी या अपघातातील जखमेला उपजिल्हा रुग्णालयात गंगापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *