
वाळुज महानगर – विजेचा दाब कमी अधिक झाल्याने टीव्ही, फ्रिज, हीटर, मिक्सर, ग्राइंडर अशी लाखो रुपये किमतीची विद्युत उपकरणे सोमवारी डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळाल्याने महावितरण च्या गलथांकारभाराविषयी सिडको वाळूज महानगर येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वडगाव कोल्हाटी गट क्र 14 अंतर्गत येणाऱ्या सिडको वाळूज महानगर -1 येथील साराकिर्ती बिल्डिंग मध्ये सोमवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक वीज पुरवठा कमी अधिक झाल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, मायक्रोओव्हन, मिक्सर, मोबाईल चार्जर, गिझर, ट्युब, लाईट, सेटअप बाँक्स, सिलींग फँन, वायफाय सेटअप आदी विद्युत उपकरणे जळाली. यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ए-1 या रो-हाऊसमधून इतर बिल्डींगला केबलद्वारे अनाधिकृतपणे विजपुरवठा देण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ही विद्युत केबल वाहन पार्किंग व घरासमोरील रस्त्यावर आहे. यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. ही केबल ट्रान्सफार्मर ऐवजी मिटर-विद्युत बाँक्सला जोडली आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी अधिक होऊन शाँर्ट सर्किट होते.

महावितरणच्या गलथान कारभारामुळेच लाखो रुपयांचे विद्युत उपकरणे जळाली असून त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी योगिता वाघ, मिना आळणे, लता घोडके, योगिता बाहेकर, सिंधू वाघ, शकूंतला टाकळकर, सुनिता बोराडे, अंजली घनवट, मंगल मुळे, उषा राऊत, सरस्वती शिंदे, योगिता पठारे, शितल देसाई, मंगल दाढीवाल, भाग्यश्री उकिर्डे, मिरा जाधव, रुपाली नारळे, प्रसन्न बाहेकर, उत्तम घोडके, आकाश बोराडे, अमोल घनवट, अशोक वाघ, शाम टाकळकर, वैभव आळणे, प्रकाश वाघ, विठ्ठल राऊत, रंगनाथ शिंदे, भगवान मुळे, प्रकाश रमानी, अमित देसाई, भगवान उकिर्डे, बाबासाहेब जाधव, अनिल वाघ, उमेश नारळे, विशाल धाडीवाल, प्रवीण कांबळे आदींनी केली आहे.
