February 5, 2026

 

वाळूजमहानगर – व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून 5 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून 21 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पतीसह 5 जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील ( हमु. संजयनगर, मुंकदवाडी) प्राची काळे हीचे फोटोग्राफर पवन बाबासाहेब काळे (वय 23) रा. जोगेश्वरी याच्या सोबत 19 एप्रिल 2024 रोजी लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवस सासरी तीला चांगली वागणुक दिली. मात्र त्यानंतर मी तुझ्यासोबत मजबुरीने लग्न केले. असे म्हणत प्राचीला शिवीगाळ करून मारहाण करीत असत. तसेच तीच्या जेवनात राख टाकणे, शिवीगाळ करणे. असा मानसिक त्रास सासु देत. मात्र प्राचीला संसार करण्याची इच्छा असल्याने ती निमुटपणे सहन करत राहीली. त्यानंतर सासु, सासरे, नंनद व नंदोई हे माहेराहून पवन यास शुटींगच्या व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेवून ये, नसता तो तुझ्या सोबत संसार करणार नाही, तुला तो नांंदविणार नाही. तसेच तुला हकलुन देवू असे म्हणत मानसिक छळ करत होते. 28 जुन रोजी 2025 तीला सासरकडील मंडळीने हाताचापाटाने मारहाण करून अंगावरील दाग दागिने काढून घेऊन एका वस्त्रानिशी हकलुन दिले. पैसे घेवून आली तरच घरात ये, तशी आली तर जिवे मारून टाकीण. अशी धमकी दिली. या प्रकरणी पती पवन काळे, सासरे बाबासाहेब काळे, सासु मंगलबाई काळे सर्व रा.जोगेश्वरी, नणंद प्रियंका खरात, नंदोई समाधान खरात रा.गव्हाण ता भोकरदन जि. जालना यांच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *