March 23, 2026

 

वाळूज महानगर, (ता.22) – जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद बीड, आणि जिल्हा हॉकी संघटना बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील शालेय हॉकी स्पर्धेच्या 19 वर्षाखालील मुलींच्या गटात बजाजनगर येथील युरेका इन्फोसिस स्कूलने पहिला क्रमांक पटकावत राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

या स्पर्धेत युरेका इन्फोसिस स्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत इस्लामपूर (सांगली) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत आपले योग्य स्थान निश्चित केले आहे. या रोमांचक विभागीय सामन्यात युरेका शाळेतील 19 वर्षांखालील संघाने कौशल्ये दाखवली. कठीण लढत असूनही जालना संघाविरुद्धच्या अंतिम विभागीय सामन्यात संघाने 0-1 असा फरकाने विजय मिळवला. गेल्या काही वर्षापासून शाळेतील हॉकी संघातील विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता संघाची 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून कस्तुरी ढोकणे, तन्वी छाजेड, श्रावणी गायकवाड या तीन प्रतिभावान विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. शाळेचे संचालक गौतम चोपडा, सुनील पाडळकर, सचिन घुगे व गौरव लोढा तसेच शाळेच्या प्राचार्य प्रज्ञा कोराने यांच्याकडून विजेत्या संघाचे स्वागत करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *