February 5, 2026


वाळुज महानगर – संडास बंद झाल्याने दोन दिवसापासून त्रस्त असलेल्या 70 वर्षीय रुग्णाने उपचारार्थ दवाखान्याचे उंबरे झिजवले. मात्र त्याची जगण्याची शक्यता नसल्याचे सांगत कोणीही ऍडमिट करून घेईना. शेवटी मेलो तरी चालेल असे म्हणून तो ऍडमिट झाला. आणि दहा दिवसाच्या उपचारानंतर तो मरणाच्या दारातून माघारी आला. हा प्रकार बजाजनगर येथील लघाने हॉस्पिटलमध्ये 15 नोव्हेंबर रोजी पहावयास मिळाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव येथील सर्जेराव उघडे वय (वर्ष 70) हा रुग्ण 5 नोव्हेंबर 2025 रोजी लघाने हॉस्पिटल बजाजनगर येथे रात्री 11:30 वाजता दाखल झाले. या रुग्णाची संडास दोन दिवसापासून बंद झालेली होती. त्यामुळे त्यांना उलटी, मळमळ पोटात दुखणे असा त्रास होत होता. हा रुग्ण येथे येण्यापूर्वी दोन-तीन हॉस्पिटलमध्ये जाऊन आला. परंतु तेथे त्याला ऍडमिट करून घेतले गेले नाही. तो ज्यावेळी लघाने हॉस्पिटलला आला. त्यावेळी त्या रुग्णाचा बीपी खूप कमी होता. लघाने हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याला तात्काळ आयसीयु मध्ये भरती केले. व पोटाचा सिटीस्कॅन केला. त्यामध्ये असे निष्पन्न झाले की रुग्णाच्या छोट्या आताड्याला छिद्र पडलेले आहे. व रक्ताचे रिपोर्ट सुद्धा खराब होते. त्यारुग्णाचे तात्काळ (इमर्जन्सीमध्ये) पोटाचे ऑपरेशन केले. त्यानंतर तो तीन दिवस कृत्रिम श्वास म्हणजेच व्हेंटिलेटरवर होता. हळूहळू तो सुधारत गेला.

पाच दिवसानंतर त्याने तोंडाने खायला सुरुवात केली. आज दहाव्या दिवशी तो रुग्ण ठणठणीत बरा होऊन सुखरूप घरी जात आहे. त्याबद्दल रुग्ण व नातेवाईक यांनी हॉस्पिटलचे व डॉक्टरांचे आभार मानले. या दहा दिवसाचा पूर्ण खर्च व ऑपरेशनचा खर्च हा लघाने हॉस्पिटलने महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत मोफत केला. त्याच्यावर डॉ.अक्षय लाघाने, डॉ.सुनिल लाघाने, डॉ.प्रफुल पवार, डॉ, उमेश रायते, डॉ.स्वप्निल उबरहांडे, डॉ चिंतन पटेल आदींनी उपचार केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *