March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.20) – वाळूज महानगरातील श्री गुरुदेव सेवाश्रम बजाजनगर येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भजन मंडळांने मातोश्री वृद्धाश्रमात येथे रविवारी 16 नोव्हेंबर रोजी खंजिरी भजनाचा कार्यक्रम सादर केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित धार्मिक सामाजिक व देशभक्ती पर भजने व अनेक संतांनी रचलेले अभंग, गवळण सादर केले. ही भजने ऐकून वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी धार्मिक व आध्यात्मिक आनंदाचा लाभ घेतला. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मराठवाडा प्रांत सेवाधिकारी मनिष जयस्वाल यांच्या नातेवाईक स्व जमुनादेवी किशनलालजी जयस्वाल यांच्या तेरवीचा कार्यक्रम मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित करण्यात आला. यानिमित्त भजन कार्यक्रम झाला. भजनानंतर वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना भोजनदान करण्यात आले. या भजन मंडळाचे प्रमुख पांडुरंग सरोदे, शंकरराव जाधव, सुनील चोरे, आशीष चिखले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भजनाचा संगीतमय कार्यक्रम प्रस्तुत केला. याप्रसंगी गिरीश जयस्वाल, विवेक जैस्वाल, सुनील मोदी, धनेश जयस्वाल, प्रभूलाल जयस्वाल, शैलेश जयस्वाल, प्रवीण जैस्वाल, कविता, वैष्णवी, सुरभी मोदी, मनीषा, अपेक्षा, सुचिता, साक्षी, सिद्धी जयस्वाल यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध पुरुष व महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक, कर्मचारी व श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *