February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.19) – शिहोर येथून दर्शन घेऊन घराकडे ॲपेरिक्षाने परतणाऱ्या 7 महिला भाविकांवर काळरुपी भरधाव जाणाऱ्या एका खाजगी बसने घाला घातल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला जागेचे ठार, तर दोन जखमी झाल्या. मात्र सुदैवाने या अपघातात तीन महिला सुखरूप बचावल्या.

हा अपघात बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर झाला. या घटनेमुळे वाळूजवर शोककळा पसरली आहे.


या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील लताबाई राजू परदेशी, आशाबाई राजू चव्हाण, मंगल अरुण गव्हाणे, भारतीबाई भगवान एकनुरे, सीमा शिवाजी काकडे, अनिता सुधाकर मोतकर, शांताबाई सिताराम बलैया, शोभा सुभाष वाघ व अन्य दोघे असे एकूण दहा जण वाळुज येथून सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील शिहोर येथे दर्शनासाठी गेले होते.

दर्शन करून 10 पैकी 2 जन तेथेच मुक्कामी थांबले. तर आठ महिला रेल्वेने भोपाळ, मनमाड मार्गे छत्रपती संभाजीनगरला आले. छत्रपती संभाजीनगरला उतरल्यानंतर शामा सुभाष वाघ (वय 50 वर्षे) रा. चितळी, ता. श्रीरामपूर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर थांबल्या. तर सात महिला भाविक छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरून ॲपेरिक्षा (एम एच 20, ई एफ – 2555) मध्ये बसून वाळुजकडे येत होत्या. महिला भाविकांची ही ॲपेरिक्षा कर्णपुऱ्याजवळ येताच खाजगी बस (एम पी 09, ए के- 8016) च्या चालकाने जोराची धडक दिली.

बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात लताबाई राजू परदेशी (वय 47) वर्ष, आशाबाई राजू चव्हाण (वय 35) दोन्ही रा. वाळूज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. तर भारती भगवान एकनुरे (वय 43) व मंगल अरुण गव्हाणे (वय 30) दोन्ही रा. वाळूज या जखमी झाल्या. मात्र सुदैवाने या अपघातातून सीमा शिवाजी काकडे (वय 45), अनिता सुधाकर मोटकर (वय 50) व शांताबाई सिताराम बलैया (वय 70 वर्ष) सर्व रा. वाळूज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या तीन महिला भाविक बालंबाल बचावल्याने त्या सुखरूप घरी परतल्या आहेत.

वाळुजवर शोककळा –
वाळूज येथील महिला भाविकांचा छत्रपती संभाजीनगर येथे पहाटे भीषण अपघात होऊन दोन महिला जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची माहिती मिळतात वाळूज येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच महिला भाविकांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत धाव घेतली. त्यांनी जखमींना योग्य मदत केली. मात्र दोन महिला जागीच ठार झाल्याने वाळुज गावावर मोठी वाळुज गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *