
वाळूज महानगर – वडगाव कोल्हाटी येथे सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते 5 कोटी 65 लाख रुपयाच्या विविध कामाचे भूमिपूजन शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी वडगाव को- बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उद्योजक कैलास भोकरे, दशरथ मुळे, शशिकांत ढमढेरे, राजन सोमासे, राम पाटोळे, माजी उपसरपंच उषा हांडे, ग्रा पं सदस्या राणी पाटोळे, मंदा भोकरे, सागर शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश साळे, अशोक लगड, बबन सुपेकर, आदिक पाटील, विकी पाटील, सुनील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी बजाजनगर, सिडको, पंढरपूर, वळदगाव, गोलवाडी, तिसगाव, वडगाव कोल्हाटी आदी गावातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येथील समस्या व प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच मतभेद सोडून सर्वानी विकासासाठी एकत्रित येण्याचेही आवाहन केले. यावेळी शिरसाट यांनी वडगाव कोल्हाटी येथील सिद्धार्थ बुद्ध विहार, सलामपूरेनगर, पंचगंगा सोसायटी, भविष्य दिपनगर, गंगोत्री पार्क, डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर, सावित्रीबाई फुलेनगर या भागातील विविध विकास कामाचे भुमिपूजन केले. या कामासाठी 5 कोटी 65 लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला रमेश दाभाडे, प्रकाश निकम, एस बी बनकर, योगेश साळे, माधव घोरबांड आदींसह नागरिकांची मोठ्या उपस्थिती होती.
