
वाळुज महानगर, (ता.15) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोन्मेष आणि संशोधन गुणवत्ता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या इन्स्टिट्यूट-लेव्हल अविष्कार स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा केली आहे.
या स्पर्धेत विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा, मेहनत आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. या स्पर्धेत विजेत्यांमध्ये अॅग्रीकल्चर आणि अॅनिमल हसबँड्री (UG): कल्याणी वसंत अमले, प्रसाद जगन्नाथ कळास्कर, अॅग्रीकल्चर आणि अॅनिमल हसबँड्री (PG): सुष्मिता संतोष जयभाये, छाया विलास जगदाळे, या प्रकल्पांतर्गत शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि प्रगत तंत्रज्ञान दाखवले. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी (UG): उत्कर्षा ठोळकाळ, अदिती प्रल्हाद कर्डिले, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी (PG): प्रिया गणेश सोलंके त्यांच्या तांत्रिक कौशल्याने आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने न्यायाधीश प्रभावित झाले. प्युअर सायन्स (UG): साक्षी जनार्दन वटणे, तनया संतोष मार्कंडे, प्युअर सायन्स (PG): रश्मी यशवंत पाडूल, श्रध्दा गंगाधर दुधणे त्यांनी शास्त्रातील सखोल ज्ञान आणि नवोन्मेषपूर्ण योगदान दाखवले. मेडिसिन आणि फार्मसी (PG): सिध्दी संजय गवंदरे, श्वेतलना शरद संभारकर मेडिसिन आणि फार्मसी (UG): दर्शन नागराव जाधव, मोनिका भगवान घुगे त्यांच्या प्रकल्पांनी आरोग्यसेवा आणि औषध क्षेत्रातील उपयोगिता स्पष्ट केली. ह्युमॅनिटी (UG): वराडे मनोज बबन त्यांच्या प्रकल्पातून मानवता, नैतिक समज आणि सामाजिक पैलूंमध्ये फार्मासिस्टच्या महत्त्वाचे योगदान दिसून आले.
या विजेत्या विद्यार्थ्यांनी श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत करणार आहेत. यामुळे महाविद्यालयाचे संशोधन व नवोन्मेष वाढविण्याचे ध्येय पुढे जाईल.
भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके, तसेच कार्यकारी अधिकारी बी. बी. जाधव, अविष्कार समन्वयक डॉ. मनोज डमाळे आणि सर्व कर्मचारी सदस्य विजेते व स्पर्धकांचे स्वागत केले.
