February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.14) – लोकांचे उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून दोन सख्खे भाऊ व जावांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन एका भावाने दुसऱ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जावाने शिवीगाळ करत हाताचापटाने मारहाण केली. ही घटना बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ईटावा येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, इटावा तालुका गंगापूर येथील बालाजी नारायण सरकटे (वय 36 वर्ष) हा व त्याचा भाऊ राजू सरकटे असे बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या बसलेले होते. यावेळी राजू याने गावातील लोकांचे उसने पैसे घेतल्याच्या कारणावरुन बालाजी नारायण सरकटे (वय 36 वर्ष) यास शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात व छातीत लाकडी दांड्याने मारून जखमी केले. व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच राजू याची पत्नी वर्षा हिने बालाजीच्या पत्नीला शिवीगाळ करुन हाताचापटांनी मारले व राजू याने फिर्यादीला जीवा मारायची धमकी दिली. याप्रकरणी बालाजी नारायण सरकटे (वय 36 वर्ष) त्यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी राजू नारायण सरकटे व वर्षा राजू सरकटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र तांदळे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *