March 23, 2026

वाळुज महानगर (ता.9) – भरधाव जाणारी एलपीजी रिक्षा वाळूज महामार्गावरील गोलवाडी फाट्याजवळ पेटल्याने ती जळून खाक झाली. मात्र सुदैवाने या रिक्षातील दोन महिला प्रवासी तात्काळ खाली उतरल्याने मोठी जीवित हानी टळली. ही घटना रविवारी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते वाळूज पंढरपूर दरम्यान प्रवाशाची वाहतूक करणाऱ्या धावत्या रिक्षा (एमएच 20, ईएफ -3050) ने रविवारी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी वाळूज महामार्गावरील गोलवाडी फाट्याजवळ अचानक पेट घेतला. यावेळी रिक्षामध्ये एक चालक व दोन महिला प्रवासी होत्या. रिक्षाने पेट घेतल्याचे समजताच प्रवासी महिला व चालक तात्काळ खाली उतरले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. मात्र एलपीजी रिक्षा जळून खाक झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *