
वाळूज महानगर – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहणाच्या धडकेत एक जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी 26 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास दहेगाव बंगला येथे झाला.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कहारवाडा ता. पैठण हल्ली मुक्काम साठेनगर वाळूज सतीश प्रकाश पल्हारे (वय 38) याला अज्ञात वाहनाने जोरात धडक करून गंभीर जखमी केले. गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रविवारी 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, रोहित शिंदे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या अपघातातील गंभीर जखमेला छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
