February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.22) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाचा व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तिघांपैकी दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनी समोर बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास झाला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील सिद्धार्थ वसंतराव खरात व नितीन भाऊसाहेब खरात दोन्ही रा. भोकरदन तालुका (हल्ली मुक्काम वडगाव को. बजाजनगर) व अन्य एक असे तिघे दुचाकी (एम एच 14, यु- 3759) वरून वाळूज औद्योगिक वसाहतीतून घाणेगावकडे जात होते. त्यांच्या दुचाकीचा गुड इयर कंपनीसमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एका अज्ञात वाहनाच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यातील सिद्धार्थ खरात व नितीन खरात हे दोन्ही जागीच ठार झाले. तर त्याच दुचाकीवरील अज्ञात एक जण (नाव, गाव माहित नाही) गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच समाजसेवक मनोज जैन, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद अबुज, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते व कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळळी धाव घेत जखमींला एका खाजगी वाहनाच्या मदतीने घाटीत दाखल केले.

               अवैध पार्किंगने घेतले बळी –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग केल्या जाते. यात अवजड वाहनांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ज्या ठिकाणी हा अपघात झाला. तेथे अवैध पार्किंग केलेली अनेक वाहने उभी होती. याच अवैद पार्किंगने दुचाकीवरील दोघांचा बळी घेतला. असे अपघातस्थळी असलेल्यांनी सांगितले. विशेष म्हणजे वाळूज औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीच्या वतीने पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केलेली असतानासुद्धा अनेक वाहनधारक पैसे वाचवण्यासाठी कुठेही वाहने उभी करतात.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *