February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.18) – वळदगाव येथे ‘एक झाड़ माँ के लिये’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून बुधवारी 14 ऑक्टोबर रोजी विविध झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

वळदगाव येथील खामनदी काठी असलेल्या नाना नानी पार्क मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी, विद्यार्थी, गावकरी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जांभूळ, चिंच, लिंब, आंबा, सुबाभूळ, निलगिरी अशा विविध देशी जातीच्या 100 च्यावर झाडांच्या रोपट्यांची लागवड केली. कार्यक्रमास सातारा पोलीस ठाण्याचे अंमलदार संतोष पंडित, वळदगावचे सरपंच अमरसिंग डांगर, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद रिंढे, उपसरपंच प्रीती मनेश शिंदे,
ग्रामपंच्यात सदस्य अशोक खोतकर, विष्णु झळके, संजय झळके, आबासाहेब झळके, विनोद खोतकर, माजी सरपंच कांतराव नवले, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, पोलीस पाटील प्रकाश म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक नवल, दीपक बर्डे, वडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *