February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.17)  – जनावरांचा चारा घेऊन घेऊन येणाऱ्या एका शेतकऱ्याची बैलगाडी खाम नदीत उलटल्याने नदीतील पाण्यात बुडून दोन बैलांचा मृत्यू झाला. या घटनेत सुदैवाने शेतकरी बालंबाल वाचला. ही घटना वाळुज जवळील नारायणपूर शिवारात गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेख जमील शब्बीर रा.यांचे नारायणपूर हा शेतकरी गुरुवारी 16 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी जनावरांचा चारा घेऊन घरी येत नारायणपूर येथील खाम नदीतील पाण्याच्या प्रवाहात त्याची बैलगाडी उलटली. त्यावेळी बैल गाडीला जुपलेले असल्याने ते पाण्यात अडकले. त्यात दोन्ही बैल मृत झाले. या घटनेत बैलांना वाचवण्याचा प्रयत्नात शेतकरी सुद्धा पाण्यात अडकलाहोता. मात्र काही दक्ष गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो बालंबाल बचावला. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *