
वाळूज महानगर, (ता.12) – बजाजनगर येथील श्रीनाथ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नॅक (NAAC) संदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना नॅक प्रक्रियेबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन मिळावे, तसेच महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक त्या तयारीची दिशा ठरवणे हे होते. 
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुधीर वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रमुख अतिथी म्हणून हायटेक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शिराळे होते. या प्रसंगी डॉ. विष्णु पाटील यांनी नॅक समितीसमोर जाण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक दस्तऐवज, दहा निकषांनुसार अहवाल तयार करण्याची पद्धत, तसेच गुणवत्तावृद्धी कशी साध्य करता येईल याविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. किशोर कदम यांनी कार्यशाळेचे नियोजन व समन्वय यशस्वीपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पिंजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. जालिंदर गवळी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रिया येवले, डॉ. रामेश्वर पवार, डॉ. गणेश राठोड, प्रा. कोमल उगले, प्रा. प्रीती आढाव, डॉ. उमेश गंगवाल, प्रा. त्रिभुवन, प्रा. भावना तायडे, प्रा. वर्षा गोरे, प्रा. वैष्णवी कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश भुसारी, वाल्मिक छाडीकर यांनी विशेष योगदान दिले. तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी विशाल जाधव, आकाश तोगळ, श्रीकृष्ण खेत्रे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात परिश्रम घेतले.
