वाळुज महानगर, (ता.7 ) – छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस आणि आयशर ट्रक यांच्यात अपघात होऊन पाच जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी ढोरेगाव येथे झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, बुऱ्हानपूर मध्य प्रदेश येथील खाजगी ट्रॅव्हलची बस पुण्याकडे जात होती. या बसच्या पुढे आयशर ट्रक जात असताना ट्रक आणि बसचा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथे मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी ट्रॅव्हल्स व आयशर ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये ट्रॅव्हल बस मधील दोन जण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ असे पाच जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळतात रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल केले.
