March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.27) – पत्नी व मुले बाहेर गेल्यानंतर घरी एकटाच असलेल्या 34 वर्षीय तरुणाने सिलिंग फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी वाळूज परिसरातील विटावा येथे घडली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, पांगरी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील विजय भगवान चंद्रोल (वय 34) हा पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह वाळूज परिसरातील विटावा येथे मारुती गांगुर्डे यांच्या घरात किरायाने राहत होता. तो दारू पिण्याच्या सवयीचा होता. गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी त्याची पत्नी कंपनीत व मुले बाहेर गेल्यानंतर विजय हा एकटाच घरी होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने घराच्या छताला असलेल्या सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार उघडकिस येतात बेशुद्ध अवस्थेत त्याला अरुण चंद्रोल व साईनाथ गांगुर्डे यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *