March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.26) – बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात बुधवार 24 सप्टेंबर रोजी पिस्तौल व चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून एक प्राणघातक शस्त्र, एक काळया रंगाची स्पोर्ट्स जीपसह 13 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार क्राइम ब्रांचचे पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी वाळूज महानगरातील सोलापुर- धुळे हायवेवरील साजापुर चौकाजवळ गुरूवार 25 सप्टेंबरच्या रात्री 3 वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलिसांना या परिसरातील एका धाब्यासमोर काळया रंगाची व फैंसी नंबर प्लेट लावलेली थार जीप (एम एच 20, एच एच- 5214) दिसली. या जीपमध्ये बसलेले युवक संशयास्पद हालचाल करताना दिसले. यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक जी. एन. कडू, सहायक पोलिस उप निरीक्षक वाळके, पोलिस अंमलदार बाळू देवबोने, सचिन भदरगे, होमगार्ड – सनद आणि राठोड यांच्यासह क्राइम ब्रांच पोलिसानी जीपची तपासणी केली. यावेळी जीपमध्ये जवळपास 15 इंच लांब आणि 2 इंच रुंद असलेले धारदार शस्त्र मिळाले. त्यामुळे पोलिसांनी जीपमध्ये बसलेले शरद भगवान कदम 29 रा.स्वस्तिक सिटी शेकापुर, नितेश श्रीराम राठोड 29 रा.फुलेनगर पंढरपुर, वैभव बाळासाहेब शिंदे 18 रा.शिवशंभोनगर शेकापुर, महादेव लक्ष्मण पवार 23 रा.टाउन हॉल जयभीमनगर, सुमित कैलास खोतकर 18 रा.पंढरपुर या 5 युवकांना एका शस्त्रासह ताब्यात घेऊन कसून चौकशी करत अटक केली. यावेळी पोलिसांनी जीपसह एकूण 13 लाख 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जब्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुना दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांनी केली चौकशी –
गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर व सहायक पोलिस आयुक्त संजय सानप यांनी पिस्तौल प्रकरणातील आरोपी आणि शस्त्रसह पकडलेल्या आरोपींची स्वतः चौकशी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *