
वाळुज महानगर, (ता.23) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमॅन ऑटो एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (संस्थे)ची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या बी -31 प्लांट येथे रविवारी 21 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मेटलमॅन ऑटो लिमिटेड कंपनीचे सी. ओ. ओ. आणि डायरेक्टर व मेटलमॅन ऑटो सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा हे होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचा वार्षिक बेरीज, नफा तोटा पत्रक ताळेबंद सभेत वाचून दाखवण्यात आला. व सर्व संचालकांना समजावून सांगण्यात आला. संस्थेने सन 2024- 25 साठी सर्व सभासदांना लाभांश 9.69 टक्के देण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेचे दीर्घ मुदत कर्ज वाटप 3 लाख रुपये होते ते वाढवून 4 लाख रुपये करण्यात आले. व अल्पमुदत कर्ज मर्यादा 30 हजार होती त्यात वाढ करून 50 हजार रुपये करण्यात आले.

सभासदांना संस्थेत मुदत ठेव घेण्याचे मान्य करण्यात आले. मुदत ठेवीचा व्याजदर 7 टक्के निर्धारित करण्यात आला. सभेत संस्थेच्या सभासदांचे पाल्य गुणवंत विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे माजी संचालक यांना अल्बम देऊन सत्कार करण्यात आला. सभासदांसाठी मार्गदर्शन करताना श्रीकांत मुंदडा यांनी संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील कॅरिअर घडवण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. तसेच सभासदांना कर्ज घेताना त्यांना गरज असेल तरच कर्ज घ्यावे, कर्जाचा दुरुपयोग करू नये म्हणून सविस्तर माहिती दिली. 
या सर्वसाधारण सभेसाठी मेटलमॅन ऑटोचे प्लांट हेड अनिलकुमार डहाळे, प्रकाश एखंडे, एच आर हेड विजय साळवे, महामुनी, युनियनचे अध्यक्ष किशोर जगताप हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. मेटलमॅन ऑटोची युनिट कमिटीने सर्व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक मंडळातील नारायण निकम, गुरुदास पराते, रामदास वनवे, श्रीनिवास सुगरे, रविंद्र कुलकर्णी, सुरेश सावंत, राजेश मानकर, बाळासाहेब वाळूज यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निकम यांनी केले. तर विजय साळवे (कोषध्यक्ष- MAECCOS) यांनी आभार मानले.
