
वाळुज महानगर – वाळूज महानगरातील गौ सेविका नयना राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाळूज जवळच्या लिंबे जळगाव येथील टोल नाक्यावर छत्रपती संभाजीनगरकडे विक्रीच्या उद्देशाने नेण्यात येणारे गोवंशाचे मास भरलेले पिकअप वाहन पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या वाहनातील जवळपास 2 लाख रुपये किंमतीचे 1 टन गोवंशाचे मास आणि 2 लाख रुपये किंमतीची लोडिंग पिकअप जीप असा एकूण 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जब्त केला. बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाई पोलिसांनी दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ममदापूर ता. राहता जि.अहिल्यानगर येथे गोवंशाची कत्तल करून हे मास छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीसाठी वाहनात नेत असल्याची विश्वसनीय गुप्त माहिती गोसेवकांना मिळाली होती. त्यानुसार गोसेविका नयना राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिंबेजळगाव येथील टोल नाक्यावर छत्रपती संभाजीनगरकडे येत असलेली गोवंशाचे मांस भरलेली पिकअप जीप (एम एच 12, एम व्ही – 1506) ला पकडून वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले. गॊ सेवकांच्या सतर्कतेमुळे पकडलेल्या या मांसाची वाळूज ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक अजय शितोळे, संदीप वाघ, रमेश राठोड यांनी तपासणी केली. तसेच पशुचिकित्सक आणि पशुसंवर्धन विभागाद्वारा या मांसाचे निरीक्षण व परीक्षण करण्यात आले. तसेच या वाहनात सापडलेल्या गोवंशाच्या अवयवामुळे हे मांस गोवंशाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी पिकअप चालक वसीम अयूम कुरैशी आणि अली जलाल कुरैशी रा.ममदापुर ता. राहाता जि. अहिल्यानगर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी ममदापुर येथे गोवंशाची कत्तल करून हे मांस छत्रपती सम्भाजीनगर येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या वाहनातील मांसाचे तुकडे (नमुने) डी एन ए चाचणीसाठी पाठविले आहे. पोलिसांनी 2 लाख रु पये किंमतीचे एकूण 1000 किलो (1 टन) मांस आणि 2 लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार स्वप्निल खाकरे यांच्या फिर्यादीनुसार वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी वसीम अयुम कुरेशी व अली जलाल कुरेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
