March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – वाळुज महानगरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात इंदिरा एकादशीनिमित बीड येथील संगीत विशारद ह भ प श्रीहरी महाराज गवते यांचे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी रघुनाथ आदमाने, पंढरपूर यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस महाभिषेक व संतपूजन करण्यात येईल. त्यांच्यातर्फे कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. या किर्तन सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *