March 23, 2026

*25 वर्षापासून प्रतिवर्षी भव्य आयोजन
*22 सप्टेंबर रोजी शुभारंभ

वाळूज महानगर, (ता.12) – वाळुज महानगरातील बजाजनगर येथील रामलीला मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनय स्वरूप संगीतमय, रामलीला 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या अकरा दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी रामलीला संचाचे रामलीला मैदानावर आगमन झाले असून नव रात्रीच्या प्रथम दिनी 22 सप्टेंबर रोजी रामलीलाचा शुभारंभ होणार असून दररोज सायंकाळी 7 वाजता रामलीलाच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग सादर करण्यात येणार आहेत.

श्री सत्य सनातन धर्म प्रचारक रामायण रामलीला मंडळ काशी (उत्तर प्रदेश) येथील पंडित हरिश्चंद्र उपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील रामलीला मंडळाचे मैदानावर आगमन झाले असून तयारी सुरू झाली आहे. याविषयीची माहिती देताना उपाध्याय म्हणाले की, गेल्या वीस वर्षापासून बजाजनगरात आमच्या मंडळाच्या वतीने अभिनय स्वरूप रामलीलाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. आमचे 30 कलाकारांचे हे मंडळ यावर्षी रामलीला सादर करताना मुकेश कुमार – राम, लवकुशजी – लक्ष्मण ,अनिल कुमार- सीता, ओमप्रकाश पांडे – रावण, पं. हरिचंद्र उपाध्याय- राजा दशरथ, पं. अभिषेक शुक्ला- हनुमान, राधिका प्रसाद- कैकयी हे आपल्या अभिनयाद्वारे रामायणातील भूमिका साकारणार आहेत. तसेच यावेळी हार्मोनियम – पंकज ओझा, ढोलक- राजू विश्वकर्मा, मजीरा -राम कैलास हे त्यांना संगीताची साथ देणार आहेत.
या रामलीला कार्यक्रमात श्रीरामजन्म, मुनी आगमन, ताडका वध, सीता स्वयंवर, राम सीता विवाह, श्रीराम परशुराम संवाद, श्रीराम वन गमन, राम रावण महायुद्ध, रावण दहन यासह रामायणातील अनेक प्रसंग हुबेहूब सादर करण्यात येतील.

कार्यक्रमा विषयी रामलीला मैदानाचे महर्षी राजेश्वरानंद तपस्वी महाराज यांनी सांगितले की, 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे रामलीला मैदानात 85 फूट उंचीच्या रावणाची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून त्याचे दहन करण्यात येईल. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्री रामाच्या राज्याभिषकाने रामलीला कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *