March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.12) – भरधाव जाणारा हायवा ट्रक व ओमनी कार यांच्यात अपघात होऊन चौघे जखमी झाले. हा अपघात बुधवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर ईसरवाडी फाटा येथे झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अज्ञात हायवा ट्रक व ओमनी कार छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरून एकापाठोपाठ पुण्याच्या दिशेने जात असताना हायवा ट्रकने इसारवाडी फाट्यावरून अचानक वळण घेतले. त्याच वेळी सिल्लोडवरून पुण्याला जाणारी ओमनी कार (एम एच 04, एल एच -2715) ही हायवा ट्रकला धडकली. बुधवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात रोहित शिंदे (वय 25), संजना शिंदे (वय 22), लहान बालक सिनू शंकर शिंदे) श्याम शंकर भोसले (वय 18) असे चौघे जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नानिजधाम यांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *