
वाळुज महानगर, (ता.9) – वाळूज महानगरातील स्वयंसिद्ध मतिमंद बालकांच्या मातृपालक संस्थेत शिक्षक दिना निमित्त सोमवार 8 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आयोजित कार्यशाळेत रोहन सांगवीकर, शिवतेज साळे, गोपीचंद पंडित, वरद कोकणे, अतुल वाघ, निखिल खवसे, पूजा श्रीखंडे, नरेंद्र झुंबड, दुर्गा गणोरकर हे विद्यार्थी आणि शाळेतील उत्कर्ष महाजन, श्रुती पोपळघट, वैभवी कुणीगलकर, आदित्य इंगोले, भाग्येश भाले या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. शिक्षकांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे शाळेचे दैनदिन कामकाज केले. या सर्व शिक्षकांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योग शिक्षिका इशिता कुळकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
