
वाळूज महानगर – संभाजीनगर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज सर्कल मध्ये मंगळवारी (ता.6) सप्टेंबर रोजी शिवसेना सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली.
वाळुज विभागातील वाळुज शहरासह लांझी, नायगाव, बकवालनगर, पिंपरखेडा, शिवराई, नारायणपूर व लिंबेजळगाव येथे मंगळवारी (ता.6) आगस्ट पासून शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मणभाऊ सांगळे, अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, वाळुज शहरप्रमुख नंदकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनोज जैस्वाल, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सर्जेराव भोंड, विभाग प्रमुख बाळासाहेब चनघटे, मनोज पिंपळे, उत्तम बनकर, पोपट बनकर, संजय शिंदे, महेश पवार, अमोल बोंद्रे, आण्णासाहेब तुपे, बाबासाहेब आरगडे, सुखदेव गुंजाळ, देवेंद्र चव्हाण, अनंता घोडके, विश्वनाथ थोरात, युवासेना उपतालुकाधिकारी रमेश आरगडे, युवासेना शहर अधिकारी सौरभ वैद्य, कुणाल राऊत, शंतनू धुमाळ, महिला आघाडीच्या लताताई इले, पद्मामावशी गंवादे, किरण बोहरा, सुनिल गायकवाड, पन्नु कुंजारे, अशोक उचाडे, अमोल राऊत, पांडुरंग मिसाळ, बापू थोरात, तुषार थोरात आदी उपस्थित होते.
