
वाळुज महानगर, (ता.1) – मनपाच्या वतीने चालविण्यात येणारी शहरबस नादुरुस्त होऊन सोमवारी एक सप्टेंबर रोजी दुपारी बंद पडली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय तर झालीच शिवाय त्रास सुद्धा सहन करावा लागल्याने प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील महावितरण कंपनीजवळ रोडवर सोमवारी 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सिडको बस स्टँड ते घाणेगावकडे येणारी शहरबस (एम एच 20, इजी – 9878) ही एअर पाईप लिकेज झाल्यामुळे नादुरुस्त होऊन अचानक रोडवरच बंद पडली. त्यामुळे या बसमधील प्रवाशांना उतरवून दुसऱ्या बसमध्ये रवाना करण्यात आले. या भंगार झालेल्या शहरबस गेल्या सहा वर्षांपासून रस्त्यावर धावत असून या शहरबस बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
