
वाळुज महानगर, (ता.31) – सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त प.म.प. पू. महंत नागराज बाबा कपाटे (आत्याबाईजी) यांच्या प्रसन्नतेने भोपे पुजारी महानुभाव समाजाच्या वतीने भव्य रथ शोभायात्रा व दुचाकी रॅलीचे आयोजन रविवार 31 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. 
घाणेगाव येथून या रथयात्रा व दुचाकी रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. घाणेगावातून निघालेली ही रथयात्रा व रॅली रांजणगाव येथील संत सावता महाराज मंदिर मार्गे बजाजनगरात पोहचली. या रथाचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले. 
बजाजनगरातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव श्रीकृष्ण मंदिर व दत्तधाम मंदिरात रथ व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे भावपूर्ण पूजन करण्यात आले. दत्तधाम मंदिरात सदभक्तांनी भजन करून आरती केली. यानंतर ही शोभायात्रा शहरात मार्गस्थ झाली. क्रांती चौकात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रथ व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे सर्व सदभक्तांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर, पैठण रोड येथील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमात रथयात्रा व दुचाकी रॅलीची सर्व संत महंतांच्या उपस्थितीत महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
संयोजक मुनिश्री सुदर्शन शास्त्री नागराज बाबा कपाटे महानुभाव व तपस्वीनी रोहिणीताई शास्त्री कपाटे महानुभाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रथयात्रा व रॅलीत भोपे पुजारी महानुभाव समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभाकर आप्पा भोजने, श्रीक्षेत्र पांचाळेश्वर जि. बीडचे अध्यक्ष रवींद्र कोठी, श्री क्षेत्र जाळीचा देव जि. बुलढाणा येथील संस्थानचे पुजारी सुधाकरराव उदरभरे, राजू उदरभरे, अरुण पुजारी वरणगाव जि जळगाव, घाणेगावचे माजी सरपंच अंकुश काळवणे, पांचाळेश्वरचे माजी सरपंच समाधान उदरभरे, कृष्णराज दर्यापूरकर, मोहनराव चोरमारे,विकास मल्ले, भास्कर मल्ले, भाऊसाहेब मोकळे, विशालदादा कपाटे, बजाजनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चिमनराव जाधव, सचिव दिगम्बर भालेराव, दत्तधाम मंदिर ट्रस्टचे मोहन नरके, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर उगले, सुरेश शिंदे, प्रकाश सारंग, देवास विडावकर, शिवाजी गायकवाड, मोहन चोरमारे, रेखा देवरे, कविता मठपती, शीला उदरभरे, लता देवरे, शीला चोरमारे, अर्चना कपाटे यांच्यासह भोपे पुजारी महानुभाव समाज, उपदेशी सदभक्त मंडळी, श्रीकृष्ण मंदिर व दत्तधाम मंदिराचे पदाधिकारी आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
