March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.31) – सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिनानिमित्त प.म.प. पू. महंत नागराज बाबा कपाटे (आत्याबाईजी) यांच्या प्रसन्नतेने भोपे पुजारी महानुभाव समाज यांनी आयोजित केलेल्या भव्य रथ मिरवणूक व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचे रविवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता घाणेगाव येथून सुरुवात होणार आहे.

ही रथयात्रा घाणेगाव, रांजणगाव, बजाजनगरातील श्रीकृष्ण मंदिर व दत्तधाम मंदिर येथे पोहचणार असून येथे रथाचे सर्व सदभक्तांच्या उपस्थितीत पूजन होईल. त्यानंतर बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक येथे सर्व सदभक्तांच्या उपस्थितीत पूजन होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील पैठण रोडवरील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम येथे रथ यात्रा व दुचाकी रॅलीची सर्व संत महंतांच्या उपस्थितीत महाप्रसाद व सांगता होईल. संयोजक मुनिश्री सुदर्शन, शास्त्री नागराज बाबा कपाटे महानुभाव व तपस्वीनी रोहिणीताई शास्त्री कपाटे महानुभाव यांच्या मार्गदर्शनाखाली भोपे पुजारी महानुभाव समाज, उपदेशी सदभक्त मंडळीनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *